crossorigin='anonymous' src='https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-1553308877182847'/> महाराष्ट्र किल्ले व स्थळे यांची माहिती Forts and places in maharashtra: अंबाबरवा वनअभयारण्य / ambabarva abhyarany

सोमवार, २७ एप्रिल, २०२६

अंबाबरवा वनअभयारण्य / ambabarva abhyarany

 अंबाबरवा वनअभयारण्य / ambabarva abhyarany

• इंग्रजांच्या काळात थंड हवेचे ठिकाण म्हणून अंबाबरवा स्थळ प्रसिद्ध होते.

अंबाबरवा वनअभयारण्य / ambabarva abhyarany


• स्थान :

महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर पूर्व विभागात अंबाबरवा अभयारण्य आहे.

• स्थापना : ९ एप्रिल १९९७ साली अंबाबरवा अभयारण्य म्हणून मान्यता मिळाली.

• क्षेत्रफळ : १२७. ७२ चौ. किलोमीटर.

• अभयारण्यातील हवामान : 

उष्ण कटिबंधीय कोरडे पानझडी स्वरूपाचे हे अरण्य आहे.

अंबाबरवा वनअभयारण्य / ambabarva abhyarany


अभयारण्य पहायला जाण्यासाठी प्रवासी मार्ग :

• नागपूर हे जवळील आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे.

• नागपूर – अमरावती – अकोट – तुंकी मार्गे आंबा बरवा रस्ते मार्गे जाता येते.

• शेगाव जवळील रेल्वे स्टेशन ६० किलोमीटर अंतरावर आहे येथून संग्रामपूर मार्गे अंबाबरवा अभयारण्य पहायला जाता येते.

अंबाबरवा वनअभयारण्य / ambabarva abhyarany


• वनस्पती जीवन : सागवान, मोह, कवठ, पिंपळ, वड, बेल, अंजन, टेमारु, धामण, कटक, आंबा, साल, कडूलिंब, घोस्ट ट्री, हळदू, बांबू, जांभळं , चिंच हे वृक्ष वेगवेगळी कंदमुळे देखील आढळतात.

• प्राणी जीवन : रानडुक्कर, हरिण, वाघ, भुंकणारे हरिण, चितळ, नीलगाय, सांभर, अस्वल, रोही, माकडे, लंगूर, ढोल, साप, अस्वल, चितळ, उडणारी खार, मकाक यासारखे प्राणी येथे पहायला मिळतात.

• पक्षी : मोर, पारवा, तितर, तांबट, सुतारपक्षी, खंड्या, कोकिळ, रानकोंबड्या, कृष्ण गरुड , पोपट, व अन्य स्थलांतरित पक्षी व पाणपक्षी येथे पहायला मिळतात.

अंबाबरवा वनअभयारण्य / ambabarva abhyarany


अभयारण्यात पाहण्यासारख स्थळे :

• जटाशंकर धबधबा :

अभयारण्यात मध्य परिक्षेत्रात असणारा हा धबधबा, शंकराच्या जटे सारखा जलप्रपात होतो . म्हणून त्यास जटाशंकर म्हटले जाते. पर्यटकांचे खास आकर्षण आहे.

अंबाबरवा वनअभयारण्य / ambabarva abhyarany


• पिंपळडोह किल्ला :

• अरण्यात पिंपळडोह असणारा किल्ला. बरीच पडझड झालेली आहे. काही अवशेष शिल्लक आहेत. विशेषत गोंड अथवा कोरकू आदिवासींनी बांधला असावा.

अंबाबरवा वनअभयारण्य / ambabarva abhyarany


• तीन दगड टॉप :

महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवर असणारा अरण्यातील सर्वात उंच भाग यास तीन दगड म्हंटले जाते. येथून अभयारण्याचे विहंगम दर्शन होते. येथे बुध धर्मीय बांधकाम आढळते.

• सोनबर्डी धरण : अभयारण्य परिसरात मोठे सोनबर्डी धरण पाणलोट क्षेत्र आहे. जे अरण्यातील प्राण्यांची पिण्याची गरज भागवते. तसेच जलसिंचनासाठी हा प्रकल्प उपयुक्त आहे.

• हडिया महाल : अभयारण्य परिसरातील एक निरीक्षण क्षेत्र म्हणून हडिया महाल ओळखले जाते.

• असलदरी, अंबाबारी : अभयारण्य परिसरात प्राणी निरिक्षणासाठी व अरण्याची मुख्य वन क्षेत्र म्हणून तसेच प्राणी पक्षी आदिवास ठिकाणे असलदरी, अंबाबारी होत.

• धूळघाट : विरळ जंगल, गवत मुख्य प्रमाणात येथे वाढते. शाकाहारी प्राणी विशेषत गवा, नीलगाय, हरणे, सांबरे या परिसरात गवत खाण्यासाठी येतात.

अंबाबरवा वनअभयारण्य / ambabarva abhyarany


अभयारण्य पाहणी करण्यासाठी योग्य काळ :

• जुलै ते सप्टेंबर पावसाळी निसर्ग पाहता येतो. पण पावसामुळे गैरसोय होते.

• ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा अभयारण्य पहायला उत्तम काळ आहे. अनेक पक्षी निरीक्षण करता येतात. विणीच्या हंगामात येथे स्थलांतरित पक्षी येतात.

• मार्च ते मे फक्त पाणवठा परिसरात प्राणी निरीक्षण करता येते.

• अभयारण्य पाहणी करण्यासाठी आलेल्या लोकांना राहण्यासाठी वन विभागाद्वारे निर्मित विश्रांती क्षेत्र आहेत. तसेच किले पिंपलाद गावाजवळ थोड्या अंतरावर गेस्ट हाऊस आहेत. या परिसरातून जंगल सफरीचा आनंद लुटता येतो.

अंबाबरवा वनअभयारण्य / ambabarva abhyarany


अभयारण्य पाहणी करताना घ्यावयाची काळजी :

• परिसरातील माहितीगार गाईड असणे उत्तम.

• प्लॅस्टिक बॉटल, प्लास्टिक पिशवीतील खाद्य पदार्थ नेऊन प्रदूषण करू नये. कापडी किंवा कागदी पिशवी वापरणे उत्तम आहे.

• प्राणी निरीक्षण करताना कोणताही आवाज करू नये. त्यांना स्पर्श करू नये.

• अभयारण्य पाहणी मार्गावरून आड बाजूला जास्त घुसू नये. टेहळणी मार्गावरून दुर्बिणीतून पाहणे उत्तम.

• प्राणी पाहताना वापरल्या जाणाऱ्या गाडीतून खाली उतरू नये.

• कॅन्टर, जिप्सी, यासारखी वाहने वापरावीत. ती खूप सोयीची आहेत.

• प्राणी निरीक्षण व फोटो कॅमेऱ्यात घेणे उत्तम. मोबाईल वापरू नये

अशी आहे आंबा बरवा अभयारण्याची माहिती.Ambabarva abhyaranyachi mahiti

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.

अहिवंतगड किल्ला / Ahivant fort

  अहिवंतगड किल्ला / Ahivant fort • स्थान : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात अहिवंतगड सातमाळा डोंगर रांगेत आहे. • उंची : सदर किल्ला हा सर...