crossorigin='anonymous' src='https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-1553308877182847'/> महाराष्ट्र किल्ले व स्थळे यांची माहिती Forts and places in maharashtra: पुल्लर लेणी / pullar leni / भिवापूर लेणी

रविवार, १९ एप्रिल, २०२६

पुल्लर लेणी / pullar leni / भिवापूर लेणी

 पुल्लर लेणी / pullar leni / भिवापूर लेणी 


स्थान :

 महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात नागपूर जिल्यातील भिवापूर तालुक्यात पुल्लर गावी जवळील पश्चिमेस असलेल्या डोंगरात पुल्लर लेणी आहेत.

पुल्लर लेणी / pullar leni / भिवापूर लेणी


लेणी समूह पाहायला जायचा मार्ग :

• नागपूर हे आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे. जे रस्ते, लोहमार्ग, हवाईमार्गाने भारतातील इतर शहराना जोडले गेले आहे.

• नागपूर बुटीबोरी या वाटेने पुढे भिवापूर हायवेने भिवापूर या ठिकाणी आल्यानंतर पुल्लर गावी व तेथून रानवाटेने पुल्लर लेणी पाहायला जाऊ शकतो.

लेणी समूहात पाहण्यालायक ठिकाणे :

पुल्लर गावी आल्यावर तेथून स्थानिक व्यक्तीच्या मदतीने आपण लेणी समूह पाहायला जाऊ शकतो. गावातून जवळच तलाव असलेल्या ठिकाणापासून रानवाटेने आपण लेणी समूहाजवळ जाऊ शकतो.

• शिलालेख :

पुल्लर लेणी / pullar leni / भिवापूर लेणी


पुल्लर गावी गणवीर बाबा नावाच्या व्यक्तीच्या शेतात एक शिलालेख सापडला. तो अस्पष्ट झालेला असून काळाच्या ओघात त्यावरील मजकूर अस्पष्ट झाल्याचे जाणवते.

• कात्याळ शिल्पे :

पुल्लर लेणी / pullar leni / भिवापूर लेणी

पुल्लर लेणी / pullar leni / भिवापूर लेणी

पुल्लर लेणी / pullar leni / भिवापूर लेणी


 लेणी पहायला जाताना रानात वाहणाऱ्या नाल्यामध्ये आपला असलेल्या खडकावर आदिम लेणी पहायला मिळतात. आदिम काळात राहणाऱ्या मानवाने कोरलेली कातळ शिल्पे पहायला मिळतात. मानव, प्राणी यांच्या भौमितिक आकृती दिसून येतात. तत्कालीन मानवाच्या बुद्धीतून साकार झालेल्या या आकृती यावरून येथे पुरातन काळात मनुष्य वस्ती होती हे समजते.

• उखळ गोटा पाषाण :

पुल्लर लेणी / pullar leni / भिवापूर लेणी


या नाल्याच्या परिसरात देखील प्राचीन वस्ती होती. येथे असणारी लयन निवास नष्ट झाली आहेत. येथे रानात असलेल्या एका पाषाणात काही खल म्हणजेच खड्डे कोरुन खोदले आहेत. या लेणी परिसरात राहणारे भिक्षू असोत अथवा आदिम वस्तीतील लोक रानातील औषधी आणून कुटण्यासाठी या उखळांचा वापर ते लोक करत होते. हे प्राथमिक निरीक्षणात जाणवते.

• लेणी गुहा :

गावाच्या पश्चिमेस असलेल्या डोंगरात आपल्याला लेणी गुहा पहायला मिळतात. येथे जाताना आपल्याला वाटेत एक कमान दिसते. त्यावर शिव मंदिर असा उल्लेख आहे.

• शिव मंदिर :

पुल्लर लेणी / pullar leni / भिवापूर लेणी


वाटेत आपल्याला एक शिव मंदिर पाहायला मिळते. जेथे महादेव पिंडी व नंदी पाहायला मिळतो. स्थानिक हिंदूनी हे मंदिर बांधले आहे.

• लेणी गुहा :

पुल्लर लेणी / pullar leni / भिवापूर लेणी

पुल्लर लेणी / pullar leni / भिवापूर लेणी

पुल्लर लेणी / pullar leni / भिवापूर लेणी

पुल्लर लेणी / pullar leni / भिवापूर लेणी


शिव मंदिर असलेल्या वाटे शेजारून पुढे आपण चालत गेल्यावर लेणी लागतात. यातील काही नष्ट झालेल्या दिसून येतात. पायरी चढून गेल्यावर आपल्याला दगड रचून केलेले भग्न बांधकाम पहायला मिळते. तेथून जाताना आपणास काही त्रिशूळ दिसतात. पुढे खोदून तयार केलेली लेणी दिसतात. पांढऱ्या रंगात असलेली लेणी. येथे फक्त एक ते दोन गुहा फक्त शिल्लक आहेत. बाकीच्या नष्ट झालेल्या आहेत. बाहेरून जाळी दरवाजा लावला आहे. आतील बाजूस शिवलिंग व इतर हिंदू धर्मीय प्रतीके पहायला मिळतात. बाहेरील बाजूस प्राकृत भाषेतील अस्पष्ट शिलालेख आहे. स्थानिक लोक यास

जगील कोपी ( जोगी कुटी) म्हणतात. पण ही प्राचीन चैत्य व विहार लेणी होती.

पुल्लर लेणी विषयी माहिती :

• प्राचीन आदिम काळापासून येथे मनुष्य वस्ती होती. येथील कातळ शिल्पावरून जाणवते.

• पुढे येथे काळानुरूप हिंदू धर्मीय वैदिक संस्कृती उदयास आली.

• हिंदू धर्मीय जाती बंधिस्त झाल्यामुळे धर्म परिवर्तन होण्यासाठी जैन तीर्थंकर व भगवान बुद्ध यांचा अवतार झाला.

• बुद्ध यांनी पाहिलेले दुखमय जीवन व उरुवेला येथे साधना करुन प्राप्त बोधीतून बुद्ध धर्म स्थापना केली. अनेक चारक भिक्षु द्वारे बुद्ध धर्म संपूर्ण भारतभर पोहचवला.

• बुधाच्या महापरीनिर्वाणानंतर अनेक राजांनी बुद्ध धर्माला राजाश्रय दिला. यामध्ये सम्राट अशोक, सम्राट हर्षवर्धन, सातवाहन व इतर राजांनी राजाश्रय दिला. त्यांनी अनेक स्तूप, स्तंभ उभारुन बुद्ध धर्मास चालना दिली.

• दक्षिण भारतात इसवी सन पूर्व २ रे शतक ते इ. स. ७ व्या शतकात अनेक राजांनी, व्यापाऱ्यांनी, राजपत्रित अधिकारी, वाहन चालक, प्रवासी यांनी दिलेल्या, व भिक्षूंना मिळालेल्या दानातून महाराष्ट्रात लेणी खोदवून घेतली गेली. विशेषत बुद्ध धर्मीय हिनयान काळात ही लेणी खोदली गेली. त्या काळात बुद्ध भिक्षूंना राहण्यासाठी, ध्यानासाठी विहार तर प्रार्थना करण्यासाठी चैत्य खोदून तयार केले. यामध्ये पुल्लर लेणी सुद्धा खोदली गेली.

पुष्यमित्र शुंग याने पुन्हा हिंदू धर्म प्रसार केल्याने अनेक बुद्ध व जैन धर्मीय बांधवांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला. व लेणी समूहाच्या परिसरात अनेक हिंदू लेणी देखील खोदली जाऊ लागली.

• पुल्लर लेणी ही बुद्ध धर्मीय भिक्षूंनी खोदून घेतली.

• कालांतराने पुन्हा येथील स्थानिकांनी हिंदू धर्म स्वीकारला.

• पुढे या लेण्यांकडे दुर्लक्ष झाले. व लेणी मुजली गेली.

• बैतूल कडील साधू तपश्चर्या करण्यास येथे आला. तेव्हा स्थानिक लोकांनी त्यास ही लेणी गुहा स्वच्छ करून उपलब्ध करुन दिली. तपश्चर्या झाल्यावर साधू निघून गेले. स्थानिक नागरिकांनी त्यांची आयुधे व वस्तू गुहेत ठेवून पूजा अर्चा सुरू केली.

• कालांतराने येथे शिवलिंग प्रतिष्ठापित केले गेले. आज या ठिकाणी अनेक हिंदू व बुद्ध लोक येथे येऊन पूजा अर्चा करताना दिसतात.

• काही बुद्ध उपासक येथील शिलालेख दाखवून लेणी बुद्ध धर्मीय असल्याचे सांगून कलह निर्माण करतात. तर स्थानिक हिंदू मंदीर असल्याचे सांगतात.

• ही लेणी धर्मनिरपेक्ष संस्कृतीचे प्रतीक बनलेली आहेत. बुद्ध असो की शिव देवता या दोन्ही शांती, संयम, ध्यान व प्रगती सांगतात. व एकाच आदिम संस्कृतीतून यांचा जन्म झाला आहे. कलह न करता धर्मनिरपेक्ष वृत्तीने येथे साधना केल्यास मनशांती लाभेल.

• अशी आहे पुल्लर लेणी विषयी माहिती माहिती

Pullar leni vishyi mahiti


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ही एक वैयक्तिक माहितीपर वेबसाईट आहे. येथे दिलेली माहिती अभ्यास व संदर्भासाठी आहे.
अधिकृत माहितीसाठी संबंधित सरकारी संकेतस्थळ पाहावे.

अहिवंतगड किल्ला / Ahivant fort

  अहिवंतगड किल्ला / Ahivant fort • स्थान : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात अहिवंतगड सातमाळा डोंगर रांगेत आहे. • उंची : सदर किल्ला हा सर...